Headlines

पूर्णा नदीतून अवैध रेतीची वाहतूक; टिप्पर मालकास एक लाखाचा दंड! महसूल विभागाची कारवाई

 

नांदुरा :- पूर्णा नदीच्या पात्रातून रेतीची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी महसूल विभागाने कठोर कारवाई करत टिप्पर मालक व चालकावर एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. २७ डिसेंबर रोजी डीघी येथे तहसीलदार श्रीशैल वट्टे व तलाठ्यांनी ही कारवाई केली होती. त्या वेळी, टिप्परमध्ये दोन ब्रास रेती वाहतूक करत असल्याचे आढळून आले. याबाबत टिप्परमालकाकडून ४१ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. यानंतर प्रकरण मलकापूर येथील उपविभागीय अधिकारी (राजस्व) यांच्याकडे पुढील कारवाईसाठी पाठविण्यात आले. त्यांनी विना क्रमांकाच्या टिप्परचे मालक शेख आसिफ शेख ईसा (दाताळा) व चालक मंगेश धोरण (दाताळा) यांच्यावर एक लाख रुपयांचा दंड लावला.अवैध गौणखनिज वाहतुकीसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर दंड आकारला जात असूनही, अशा प्रकारच्या घटनांमध्ये अजूनही घट होत नसल्याने प्रशासनाबद्दल शंका निर्माण होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!