नांदुरा : लोणवडी शिवारातील
धरणात बुडून रोशन दिगंबर तांदूळकर या १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ३० सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता पूर्वी घडली. याबत फिर्यादी गणेश मधुकर तांदूळकर रा. कृष्णानगर, नांदुरा यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा चुलतभाऊ रोशन दिगंबर तांदूळकर (वय (१८) रा. लोणवाडी हा बकऱ्या चाऱ्यासाठी गेला होता. परंतु,
तो परत घरी आला नाही म्हणून फिर्यादी व गावातील लोकांनी त्याचा शोध घेतला. त्यावेळी ग्राम लोणवाडी येथील धरणातील पाण्यावर त्याचा मृतदेह तरंगताना दिसला. यावेळी त्याला बाहेर काढले व उपचाराकरिता दवाखान्यात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. फिर्यादी गणेश तांदूळकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता १९४ कलमाखाली मर्ग दाखल केला असून पुढील तपास पोहेकॉ गजानन इंगळे करीत आहेत.