Headlines

विहीरीत सापडला मृत बिबट्या, शिकार करताना विहिरीत पडल्याचा संशय.. मुक्ताईनगर तालुक्यातील भोटा येथील घटना!

 

मुक्ताईनगर:- तालुक्यातील भोटा शिवारात एका विहिरीत बिबट्याचा मृतदेह सापडला आहे. शिकारीचा पाठलाग करत असताना तो विहिरीत पडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
भोटा येथील गट क्रमांक ८१ मधील शेतकरी रायबा तुळसीराम मोरे बुधवारी सकाळी शेतात गेले असता त्यांना दुर्गंधी येत असल्याची जाणीव झाली. त्यांनी दुर्गंधीचा उगम शोधण्यासाठी विहिरीकडे पाहिले असता पाण्यात बिबट्याचा मृतदेह तरंगताना दिसला.
त्यांनी तातडीने पोलीस पाटील राम पाटील यांना याबाबत माहिती दिली. त्यांनी वनविभागाला सूचित केले. वनक्षेत्रपाल परिमल साळुंखे, स्वप्निल गोसावी, अक्षय मोरे, सुधाकर कोळी, उमेश तायडे आणि इतर सहकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.
बिबट्याचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढून शवविच्छेदन करण्यात आले. नंतर त्यावर योग्यरीत्या अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!