मोताळा:- तालुक्यातील बोरखेडी येथे विद्युत दुरुस्ती करताना शेतात विजेचा धक्का बसून एका विद्युत सहाय्यकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. विशेष म्हणजे, या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर दुर्लक्ष केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 17 फेब्रुवारी रोजी सकाळी घडली. मृत व्यक्तीचे नाव हनुमान चव्हाण (वय ४९) असे असून, ते विद्युत महावितरण कंपनीत सहाय्यक म्हणून कार्यरत होते. शेतातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी ते गेले असता अचानक त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून, बेजबाबदारपणामुळे हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी 28 फेब्रुवारी रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी संबंधित दोषींवर गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.