मोताळा: भक्तीमय वातावरणात पोफळी येथे दरवर्षीप्रमाणे श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गावकरी आणि भाविक भक्तांच्या सहकार्याने हा सोहळा भक्तिरसात पार पडणार आहे.
यंदा दि. 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता श्रींची आरती होणार असून, त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघणार असून, पंचक्रोशीतील हजारो भाविक महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी पोफळी येथे दाखल होणार आहेत. गावकऱ्यांनी विशेष आकर्षण म्हणून पारंपरिक भजन, कीर्तन व पालखी मिरवणुकीचे नियोजन केले आहे. या सोहळ्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पोफळी येथील ग्रामस्थांनी केले आहे.