मोताळाः तालुक्यातील कुऱ्हा गावात २३ वर्षीय तरुणाने निंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी, २१ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मृतकाचे नाव गजानन पांडूरंग तायडे असे आहे.गजाननचे चुलतभाऊ शिवाजी ओंकार तायडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गजानन तायडे हे २१ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता शेतात गेले होते. मात्र, काही वेळानंतर गावात चर्चा झाली की गजानन यांनी त्यांच्या शेतामध्ये निंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे.शिवाजी तायडे यांनी शेतात जाऊन पाहिले असता, गजानन निंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यानंतर धा.बढे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मर्ग नोंदवला आहे.
गजानन तायडे यांच्या आत्महत्येचे नेमके कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास धा. बढे पोलीस करत आहेत. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.