डिडोळा बु येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी राज्यस्तरीय स्काऊट शिबिरासाठी पात्र

डिडोळा, मोताळा: महाराष्ट्र शासनांतर्गत भारत स्काऊट राज्यस्तरीय राज्य पुरस्कार चाचणी शिबिराचे आयोजन 2 ते 5 डिसेंबर 2024 या कालावधीत संभाजीनगर येथे करण्यात आले. या शिबिरात सहा जिल्ह्यांतील 140 स्काऊट विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून बुलढाणा जिल्ह्यातून 33 विद्यार्थी सहभागी झाले.डिडोळा बु येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांनी या शिबिरासाठी पात्रता मिळवली. सम्राट सुधाकर गाडेकर, रितेश भगवान गायकवाड, अथर्व सुनिल गवई आणि रोशन निंबाजी अहिरे या विद्यार्थ्यांनी स्काऊट शिक्षक आर. सी. देवरे सर आणि मुख्याध्यापक पाटणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कामगिरी केली.गाईड शिक्षिका वाय. आर. पाटील मॅडम यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या शिबिरानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना प्रदान केले जाणार आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. दादासाहेब विसपुते, सचिव श्री. मोरे साहेब आणि मुख्याध्यापक पाटणे सर यांनी अभिनंदन केले. शाळेत चारही विद्यार्थ्यांचा आणि स्काऊट शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या यशाचा अभिमान सरस्वती विद्यालयाने व्यक्त केला असून भविष्यातही विद्यार्थ्यांना अशीच प्रोत्साहनपर संधी मिळावी, अशी भावना शाळा प्रशासनाने व्यक्त केली.

Leave a Comment

error: Content is protected !!