Headlines

ट्रीपला जाऊन येतो म्हणत घरातून निघाला; तळणीचा ३० वर्षीय तरुण दुचाकीसह बेपत्ता!

 

मोताळा :- ट्रीपला जाऊन येतो असे सांगून घरातून निघालेला ३० वर्षीय तरुण दुचाकीसह बेपत्ता झाल्याची घटना तालुक्यातील तळणी परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी बोराखेडी पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तळणी येथील जनार्धन गणपत कुयटे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांचा मुलगा गजानन जनार्धन कुयटे (वय ३०) हा ७ मार्च रोजी दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास ट्रीपला जाऊन येतो असे सांगून घरातून बाहेर पडला. त्यावेळी त्याच्याकडे एमएच २८ बीडब्ल्यू ८९४८ क्रमांकाची दुचाकी होती.
मात्र, बराच वेळ होऊनही तो घरी परतला नाही. नातेवाईक व परिचितांकडे शोध घेतला असता त्याचा कुठेही मागमूस लागला नाही. दरम्यान, रविवारी (८ मार्च) त्याच्या बेपत्ता झाल्याची नोंद बोराखेडी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!