Headlines

नदीत पोहत असताना अचानक पूर आला, एक वाहून गेला तर दिघे बचावले, मोताळा तालुक्यातील घटना!

मोताळा/ रोहिणखेडः नदीत पोहत असताना एक जण वाहून गेला तर तिघे जण बचावले ही घटना येथील नळगंगा नदीत सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान घडली यामध्ये २५ वर्षीययुवक अनिसशहा मकसूद शहा वाहून गेला.रोहिणखेड येथील नळगंगा नदीत आज शुक्रवार २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान अनिसशहा मकसूद शहा, मोहमंद अफजल, बशीरशहा बाबाशहा, मोहमंद अयेसान मो. लुकमान पोहत होते. दरम्यान, डोंगरात जोरदार पाऊस झाल्याने नदीला अचानक पूर आला. यावेळी नदीत पोहणाऱ्या युवकांची मोठी धांदल उडाली. ते मदतीसाठी आरडाओरड करुन बाहेर निघण्याचा प्रयत्न करु लागले. जीवाची पर्वा न करता गावातील जीवन राजनकर, मोहमंद अरबाज, ऋषीकेश जंवजाळकर यांनी नदीमध्ये उडी घेत मोहमंद अफजल, बशीरशहा बाबाशहा, मोहमंद अयेसान मो. लुकमान यांना बाहेर काढल्याने त्यांचे जीव वाचले. मात्र अनिसशहा मकसूद शहा (वय २५) हा युवक वाहून गेला, त्याचा वृत्तलिहेपर्यंत थांगपत्ता लागला नव्हता. ग्रामस्थ त्याचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *