बोराखेडी परिसरात संशयास्पद परिस्थितीत आढळला मुलीचा मृतदेह; घटना की घातपात?

 

मोताळा : – तालुक्यातील बोराखेडी शिवारात दुपारी एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा सुरू केला.
प्राथमिक तपासात मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, नेमकी घटना कशामुळे घडली याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले असून घटनास्थळावरून वैज्ञानिक पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे मोताळा तालुक्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, दोषींना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असून पुढील माहिती तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!