Headlines

दलित वस्तीतील सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमन काढले नसल्याने ग्रा. पं. ला अमरण उपोषनाचा इशारा.

(जळगाव जिल्हा प्रतिनिधी )मोरगाव बु. (ता. रावेर | जि. जळगाव):

मोरगाव बु. येथील दलित वस्तीतील सार्वजनिक रहदारीच्या रस्त्यावर बेकायदेशीर व अनधिकृत अतिक्रमण झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, संबंधित प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य श्री. किरण हरसिंग ढिवरे यांनी केला आहे.

श्री. किरण ढिवरे यांच्या घरासमोरील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या सार्वजनिक रस्त्यावर महेंद्र भादु ढिवरे व अनिल किसन ढिवरे यांनी बेकायदेशीररीत्या झोपड्या उभारल्या आहेत. या झोपड्यांमध्ये गुरे, ढोरे व बकऱ्या बांधण्यात येत असून त्यामुळे सार्वजनिक रस्त्यावरील रहदारी पूर्णपणे अडथळित झाली आहे. नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या अतिक्रमणाबाबत श्री. किरण ढिवरे यांनी ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिकांकडे तोंडी व लेखी स्वरूपात वारंवार तक्रारी केल्या. प्रत्यक्ष अतिक्रमणस्थळी अधिकाऱ्यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणीही केली. मात्र, गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून सतत पाठपुरावा करूनही ग्रामपंचायतीकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.

यानंतर पंचायत समिती रावेरचे गटविकास अधिकारी यांच्याकडेही अतिक्रमण काढण्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली. ग्रामपंचायतीला कारवाईचे आदेश देण्यात आले असतानाही प्रत्यक्षात अद्याप अतिक्रमण हटवण्यात आलेले नाही.

या पार्श्वभूमीवर श्री. किरण हरसिंग ढिवरे (ग्रामपंचायत सदस्य) यांनी इशारा दिला आहे की,

महेंद्र भादु ढिवरे व अनिल किसन ढिवरे यांचे सार्वजनिक रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण ७ दिवसांच्या आत हटवण्यात आले नाही, तर ग्रामपंचायत मोरगाव बु. व स्थानिक प्रशासन यांना जबाबदार धरून अमरण उपोषण सुरू करण्यात येईल.

या प्रकरणामुळे गावात तीव्र संताप व्यक्त होत असून, प्रशासन आता तरी ठोस पावले उचलणार का? याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.

पुढील कार्यवाही साठी व माहितीस्तव, सादर…….

१] . म. मुख्य‌कार्यकारी अधिकारी , जि.प. जळगाव,

२] मा. तहसिलदार . तहसिल कार्यालय, रावेर

३] म. गटविकास अधिकारी पं. स. सवेर

४] म. पोलिस निरिक्षक पो. स्टे, रावेर

ग्रामपंचायत मोरगाव बु ll – अर्ज करण्याची तारीख:- १५ / ०६ / २०२५

2) म. गटविकारन अधिकारी, पंचायत समिती रावेर – अर्ज करण्याची तारीख ०४ / ०७ / २०२५

3) म. ग्रामपंगायत अधिकारी/सरपंच गोरगाव बु ll – अर्ज करण्याची तारीख २४ /१२ / २०२५

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!