Headlines

मलकापुरात गोगा नवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा, जय गोगा महाराज यांच्या नाम गजरात दुमदुमली मलकापूर नगरी!

मलकापूर – गोगानवमी उत्सव निमित्त मलकापूर शहरात निघालेल्या भव्य शोभायात्रा मध्ये गोगा महाराज यांची छडी ,प्रतिमा पूजन माल्यार्पण करून शोभायात्रा मध्ये सहभाग घेउन संत मंडळी यांचा आशीर्वाद मलकापूर नगर वासियांनी घेऊन सामाजिक समरसता भावाचे दर्शन घडवले.

गोगा महाराज हे आपल्या देशातील थोर संत मधुन एक होतें खूप तेजस्वी संत होते. गोगा नवमी हा आपल्या धर्मा मधील वाल्मिकी समाजाचा एक प्रमुख सण आहे जो गोगादेव म्हणजेच जहरवीरजी यांची जयंती म्हणून साजरा केला जातो. या दिवशी नागांची पूजा ही केली जाते. गोगा नवमीला गोगादेवाची विशेष पूजा केल्याने भक्ताला संतानप्राप्तीचे सुख प्राप्त होते, असे मानले जाते.
मलकापूर शहरातील मुख्य मार्ग मधुन संस्कृत वाद्य यांच्या गजरात गोगा महाराज यांची छडी, भगवान महादेव, छत्रपती शिवाजी महाराज, भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विशालकाय झाकी यांनी मलकापूर वासियाचे लक्ष्य वेधले शोभा यात्रा मार्ग मध्ये ठीक ठिकाणी जलपान शोभायात्रा मध्ये सहभाग घेणाऱ्या भाविकांन करिता करण्यात आले होते.

चौकट – अश्या उत्सवामध्ये सर्वांनी सहभाग घेणे आवश्यक आहे .आपल्या धर्मात जातीय राजकारण मुळे एक जातीय दरी आपल्यात निर्माण झाली आहे आणि याने आपण जाती जातीत विभागून गेलो आहोत आपण सकल हिंदु समाज जात,पात,पंथ,पक्ष,भेद विसरून हिंदु म्हणून संघटित होणे गरजेचे आहे आणि या करिता आपल्या समाजातील विविध सामाजिक धर्मिक उत्सव एकजुटीने साजरे करणे एक उत्तम मार्ग आहे – सुयोग शर्मा – विश्व हिंदु परीषद जिल्हा सहमंत्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!