मलकापूर : मलकापूर ते मोताळा मार्गावरील तालखेळ फाट्याजवळ २२ जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता भीषण अपघात झाला. टाटा सफारी आणि मोटारसायकलच्या धडकेत एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मोताळा तालुक्यातील चिंचपूर येथील चंद्रभान चोकाजी तायडे (६०) आणि विनोद रतन सोनत (३५) हे दोघे मोटारसायकल (क्रमांक MH 28 Y 6085) वरून मलकापूरहून मोताळ्याकडे जात होते. दरम्यान, समोरून भरधाव आलेल्या टाटा सफारी (क्रमांक MH 28 V 5353) ने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या चंद्रभान तायडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर विनोद सोनत यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर मलकापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.