Headlines

शेतकऱ्यांच्या मक्याच्या गंजीला आग, एक लाखाचे नुकसान, मलकापूर तालुक्यातील बेलाड येथील घटना!

 

मलकापूर:- तालुक्यातील बेलाड येथील शेतकऱ्याच्या शेतातील मक्याच्या गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याने सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना १६ जानेवारी रोजी रात्री घडली असून, याप्रकरणी २१ जानेवारी रोजी अज्ञाताविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या चार महिन्यांत या भागातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन, तूर आणि कुटार यांच्या गंजींनाही आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रीकृष्ण जनार्धन संबारे (वय ६४, रा. बेलाड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, खापरखेडा शिवारातील गट क्रमांक ८० मधील दीड एकर शेतीत मक्याची पेरणी केली होती. १६ जानेवारी रोजी रात्री १:३० वाजता त्यांच्या चुलत भावाचा मुलगा अमोल उल्हास संबारे याने आग लागल्याची माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!