Headlines

चालकाला डूलकी लागली अन् आयशर वाहन दुभाजकावर चढले.. इलेक्ट्रिक पोल जमीनदोस्त! मलकापूर शहरातील घटना

 

उमेश ईटणारे
मलकापूर :- आयशर वाहन दुभाजकावर चढून इलेक्ट्रिक पोल जमीन दोस्त झाल्याची घटना दि. 22 रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास मलकापूर बुलढाणा रोडवर असलेल्या चाणक्य ट्रॅव्हल्स समोर घडली.या अपघातात इलेक्ट्रिक पोल जमीनदोस्त झाला असून दुभाजकाचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की एम एच 18 बी जी 4639 या क्रमांकाचे आयशर वाहन बुलढाण्याकडून अमरावतीला जात होते दरम्यान मलकापुरातून जात असताना चाणक्य ट्रॅव्हल्स समोर वाहन आले असता चालकाला डुलकी लागली अन् वाहन दुभाजकावर चढले वाहन भरधाव असल्याने दुभाजकावर असलेला इलेक्ट्रिक पोल जमीनदोस्त झाला असून दुभाजकाचे नुकसान झाले आहे. दरम्यान रात्रीची वेळ असल्याने रस्त्यावर वाहनांची रीघ कमी असल्याने मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान घटनास्थळी पोलीस दाखल होऊन क्रेनच्या साह्याने सदर वाहन दुभाजकातून काढून रस्ता मोकळा केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *