मलकापूर/मोताळा / देवधाबा :
पोळ्याच्या दिवशी बैल धुण्यासाठी नदीवर गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने मलकापूर तालुक्यातील हरणखेड, देवधाबा आणि मोताळ्यातील गुळभेली येथे तिन्ही गावात पोळा भरलाच नाही.नदीमध्ये बैलांना धुण्यासाठी नेत असताना हरणखेड येथील गोपाल प्रभाकर वांगेकर व देवधाबा येथील प्रवीण काशिनाथ शिवदे या युवा शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तर हरणखेड येथील बाप-लेक बैल धुण्यासाठी
नदीवर गेले होते. बैलाची दोर हाताला गुंडाळून गोपाल नदीच्या पात्रात उतरला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने आतमध्ये फसून बैलासह बुडाला. मात्र, थोड्याच वेळात बैल वर आला, पण युवा शेतकऱ्याचा मृत्यू झाला. पोटच्या पोराला मृत्यूच्या खाईत जाताना बघण्याची पाळी बापावर आली. तसेच जिल्ह्यातील गुळभेली येथील महेंद्र चव्हाण याचा जवळचा नातेवाइक थोडक्यात बाचावला असून, त्याच्यावर बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.