Headlines

मलकापूरच्या अब्दुल हमीद चौकात क्षुल्लक कारणावरून दोन समाजात दगडफेक; पोलिसांचा मोठा बंदोबस्त! परिसराला छावणीचे स्वरूप

मलकापूर : – शहरातील अब्दुल हमीद चौक परिसरात लहान मुलांच्या किरकोळ कारणावरून दोन समाजांमध्ये तणाव निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, किरकोळ वादातून काही जणांमध्ये वाद वाढत गेला आणि त्यानंतर परिसरात दगडफेक झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर दोन्ही समाजातील नागरिक मोठ्या संख्येने अब्दुल हमीद चौक परिसरात जमा झाले होते. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

रस्त्यावर पडलेले दगड

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या अब्दुल हमीद चौक परिसराला जणू छावणीचे स्वरूप प्राप्त झाले असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. घटनेचे नेमके कारण आणि संबंधितांची चौकशी सुरू असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!