मलकापूर (दिपक इटणारे): सत्य बोलणाऱ्याचा शत्रू जगभर असतो, पण सत्याचं तेज कधीही मावळत नाही, असं म्हणतात आणि मलकापूरात त्याचं जिवंत उदाहरण घडलं. विघ्नहर्ता पण कृतीने विघ्ननिर्माता ही बातमी प्रसिद्ध होताच, त्या तथाकथित डॉक्टराचा अहंकारी भाऊ संतापाच्या भरात पत्रकाराकडे आला. पण आला तो सत्य दाबायला, दडपशाही दाखवायला. त्याची भाषा आणि ताण पाहूनही पत्रकार शांत राहिला नाही, कारण म्हण आहे, सत्याला धार असते, ती कुणाच्या भीतीने बोथट होत नाही, भाऊ विचारतो, अरे का रे, कशाला लिहिलंस? त्यावर पत्रकाराचं प्रत्युत्तर ठणकदार ‘ही जनतेची भाषा आहे, तुमच्या अहंकाराची नाही, इतकं ऐकताच त्या भावाचा तो राग, जणू भिजल्या मांजरीसारखा शांत झाला. शेपूट घालून मागे सरकला आणि डांगीला पाय लावून पळ काढला. ही घटना सांगते सत्याचा दिवा फुंकर घालून विझत नाही, उलट अधिक तेजाने पेटतो. लोकशाहीत पत्रकाराला गप्प बसवायचा प्रयत्न करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावं, शब्द हे शस्त्र असतं, आणि जेव्हा ते जनतेसाठी उचललं जातं, तेव्हा सत्ता, संपत्ती आणि अहंकार सगळं थरथर कापतं. ‘विदर्भ लाईव्ह’ कोणाचं राजकारण नाही, ना कुणाची मालकी. इथे फक्त जनतेचा आवाज बोलतो आणि तो आवाज गप्प करण्याचं धाडस कोणाच्याही आवाक्याबाहेरचं आहे. जर सत्य मांडणं हा गुन्हा असेल, तर आम्ही अशा शंभर गुन्ह्यांसाठीही तयार! कारण भिती पसरवणं आमचं काम नाही, आम्ही बुळखालील अंधार उजेडात आणतो. आणि तो उजेड पाहून अनेक विघ्ननिर्मात्यांचे डोळे झाकले जातात, हेच खरं यश!
विघ्ननिर्माता — भाग 3 लवकरच…..
जशी करनी तशी भरणी; अहंकाराला नेहमी सत्याचीच उत्तरं मिळतात.
