मलकापूर: – ४२ वर्षीय महिलेसोबत बलात्कार केल्याप्रकरणी सागर किसन मोरे (रा. वाकोडी) याच्याविरुद्ध मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
१३ मे रोजी सायंकाळी ६ वाजता पीडित महिला नदीकाठी असलेल्या शौचालयात गेली असताना आरोपी तिच्याजवळ आला. त्याने महिलेसोबत लग्न करण्याचा आग्रह केला. महिलेनं नकार दिल्यानंतर त्याने मारहाण करून जबरदस्तीने दोन वेळा बलात्कार केला. त्यानंतर जिवे मारण्याची धमकी दिली आणि तिच्या गळ्यातील ४ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र व १६ हजार रुपयांची रोकड घेऊन पळून गेला. महिलेच्या फिर्यादीनुसार मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय करूणाशील तायडे करत आहेत. आरोपी मोरे हा वाकोडीचा रहिवासी असून सध्या मुंबईत काम करतो. तो मुंबईकडे पळून गेला असण्याची शक्यता आहे.