मलकापूर: येथील बन्सीलाल नगरातील चाकूचा धाक दाखवत एका 78 वर्षीय वृद्ध महिलेची 25 हजार रुपयांची लूट केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत दोन संशयितांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. गुरुवारी रात्री 2.15 वाजताच्या सुमारास, टोळधाड करून दोन अज्ञात आरोपींनी वृद्ध महिलेच्या घरात घुसून तिला धमकावले आणि 25 हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत संशयित शिवराज गजानन सोनोने (23) आणि सुरज भिका तायडे (25) या दोघांना अटक केली. अधिक तपास मलकापूर पोलीस करत आहेत.
मलकापुरातील बन्सीलाल नगर चोरी प्रकरणातील दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी!
