Headlines

पदमश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात “पायपिंग डिझाईन इंजिनीअरिंग” करिअर मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

 

मलकापूर, ६ मार्च २०२५ – पदमश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूरच्या अंतर्गत गुणवत्ता आश्वासन कक्ष आयक्यूएसी अंतर्गत “पायपिंग डिझाईन इंजिनीअरिंगमधील करिअर संधी” या विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून एशियन अकॅडमी ऑफ प्रोफेशनल ट्रेनिंग इंडिया प्रा. लि., पुणे येथील बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर श्री. रवी जोरीगल उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. पी. व्ही. चोपडे, प्रशिक्षण व स्थाननियोजन प्रभारी यांनी केले. तसेच महाविद्यालयाचे आयक्यूएसी अधिकारी प्रा. आर. एम. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. याशिवाय मेकॅनिकल विभाग प्रमुख प्रा. एस. आर. शेकोकर, प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी देखील या कार्यक्रमासाठी महत्त्वपूर्ण सहकार्य केले.
या मार्गदर्शन सत्रात श्री. जोरीगल यांनी पायपिंग डिझाईन इंजिनीअरिंग या क्षेत्रातील करिअर संधी, आवश्यक कौशल्ये, उद्योग मानके तसेच तेल व वायू, पेट्रोकेमिकल्स आणि वीज निर्मिती यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये उपलब्ध संधी यावर सखोल माहिती दिली. विद्यार्थ्यांनी या चर्चेत उत्स्फूर्त सहभाग घेतला व विविध शंकांचे समाधान करून घेतले.
पदमश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नेहमीच विविध मार्गदर्शन व प्रशिक्षण उपक्रमांचे आयोजन करत असते. महाविद्यालय भविष्यातही अशाच प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करेल असे प्रतिपादन महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. नानासाहेब पाटील व सदस्य अनिल इंगळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!