मलकापूर – पूर्णा नदी पात्रातील अवैध रेती उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाने धडक मोहीम उघडली आहे. २० जानेवारी रोजी धरणगाव-मलकापूर हायवेवर सब्बा ब्रास रेतीने भरलेले ट्रॅक्टर पकडून ट्रॅक्टर-ट्राली व रेतीसह तहसील कार्यालयात जमा करण्यात आली. पूर्णा नदीत अवैध उत्खनन करून टिप्पर व ट्रॅक्टरद्वारे रेती वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर महसूल विभागाचे पथक सक्रिय झाले. संबंधित प्रकरणात तहसीलदार राहुल तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी जे.ए. वानखेडे, जे.आर. जेऊघाले, कोतवाल विनोद नारखेडे आणि वाहनचालक मनोज वानखेडे यांनी ही कारवाई केली. या कारवाईमुळे अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.