Headlines

सानिया कार गॅरेजला भीषण आग, 10 ते 12 कारसह स्पेअर पार्ट्स जाळून खाक; लाखोंचे नुकसान, मलकापूर शहरातील घटना!

 

मलकापूर:- मलकापूरच्या बुलढाणा रोडवरील सानिया कार गॅरेजमध्ये आज, 20 जानेवारी रोजी सकाळी 5 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत दुरुस्तीसाठी आलेल्या 10 ते 12 चारचाकी वाहनांसह सुमारे 10 ते 15 लाखांचे स्पेअर पार्ट्स जळून खाक झाले. या दुर्घटनेत एकूण नुकसान लाखोंच्या घरात असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, गॅरेजमध्ये उभी असलेल्या स्विफ्ट डिझायर कंपनीच्या गाडीला अचानक आग लागली. आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले आणि आजूबाजूच्या गाड्यांनाही आपल्या विळख्यात घेतले. गॅरेजमध्ये असलेले लाखोंचे स्पेअर पार्ट्सही या आगीत भस्मसात झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला कळवले. चालक वासुदेव भोपळे व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. मात्र, आग इतकी भयंकर होती की ती विझवण्यासाठी तीन तास शर्तीचे प्रयत्न करावे लागले. अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, गॅरेजमधील वाहनांसह स्पेअर पार्ट्स जळाल्यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!