मलकापूर :- दि. ११ व १२ ऑक्टोबर रोजी मलकापूर शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी काठावरील घरांचे व मालमत्तेचे नुकसान झालेले सानुग्रह अनुदानापासून वंचित असलेल्यांना तात्काळ सानुग्रह अनुदान मिळवे यासाठी
वरील विषयास अनुसरून आपणाकडे सविनय निवेदन सादर करण्यात येते की, गत् ११ व १२ ऑक्टोबर २०२४ रोजी मलकापूर शहरासह परिसरामध्ये अतिवृष्टीसदृष्य मुसळधार पाऊस झाला. त्यातच नळगंगा धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने मलकापूर शहरातून वाहणाऱ्या नळगंगा नदीपात्राला मोठा पुर आल्याने या पात्राच्या परिसरातील नागेश्वर मंदीर व दुर्गादेवी मंदीर परिसरातील अनेकांच्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पुराचे व पावसाचे पाणी शिरल्याने मालमत्तेसह घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबतचा प्रशासनाच्या सर्व्हे करण्यात आला असतांनाही या भागातील नुकसानग्रस्त हे शासनाच्या सानुग्रह अनुदानापासून वंचित आहेत. तर दुसरीकडे ज्या भागामध्ये अतिशय कमी नुकसान अथवा नुकसानच झाले नाही अशांना प्रशासनाच्या वतीने सानुग्रह अनुदानाची रक्कम देण्यात आली. त्यामुळे खरोखर जे नुकसानग्रस्त आहेत त्यांच्यावर एकप्रकारे हे प्रशासनाच्या वतीने अन्यायच करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे वार्ड क्र. २४ नागेश्वर मंदीर परिसरात असलेल्या सरकारी शौचालयामध्ये पुराचे पाणी शिरल्याने घाण व गाळ साचलेला असल्याने ते आजरोजी बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे सरकारी शौचालय असतांना देखील नागरिकांना याचा काहीही उपयोग होत नाही. तसेच याच परिसरात पुराचे व पावसाच्या पाण्यामुळे नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घाण, कचरा व गाळ साचल्याने नाल्या ह्या चोकअप झालेल्या आहेत. त्यामुळे नाल्यांमधून काही ठिकाणी पाणी हे रस्त्यावरून सुध्दा वाहत आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या उद्भवलेल्या परिस्थितीमुळे व यापुर्वीही या परिसरातील पाईपलाईनचा प्रश्न हा गंभीर स्वरूपाचा असून या – भागातील असलेली पाईपलाईन ही ४ इंची असल्याने व त्यावर वाढलेले नळांचे कनेक्शन पाहता ती पााईपलाईन – ६ इंची करण्यात यावी.वरील मागण्यांबाबत प्रशासनाने सहानुभूतीपुर्वक विचार करून सानुग्रह अनुदानापासून वंचित असलेल्या नुकसानग्रस्तांना तात्काळ सानुग्रह अनुदान वितरीत करण्याबरोबरच या परिसरातील सार्वजनिक शौचालय, नाल्या व पाईपलाईनचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा. अन्यथा आम्हाला आमच्या न्याय मागण्यांसाठी लोकशाही मार्गान उपोषणाचा मार्ग अवलंबवावा लागेल याची नोंद घेण्यात यावी. करीता आपणाकडे निवेदन सादर