मलकापूर :- शिक्षण विभाग पंचायत समिती मलकापूर व तालुका विज्ञान शिक्षक संघटना मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी पद्मश्री डॉ. व्ही.बी.कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय मलकापूर येथे शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयावर आयोजित करण्यात आली होती.या विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय श्री चैनसुखजी संचेती यांच्या शुभहस्ते करण्यात आले याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून लोकसेवा शिक्षण बहुउद्देशीय मंडळ मलकापूर चे सचिव माननीय श्री डाॅ.अरविंदजी कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री अनिलजी खर्चे सर डीन श्री युगेश खर्चे सर विभाग प्रमुख श्री रमाकांत चौधरी सर गटशिक्षणाधिकारी श्री एन. जे. फाळके साहेब विस्तार अधिकारी श्री एन. बी. शिंदे साहेब प्राथमिक शिक्षक संघटनांचे अध्यक्ष श्री आर.आर. पाटील सर श्री संजय इंगळे सर श्री बी. आर. दांडगे सर जिल्हा कार्याध्यक्ष श्री नितीन महाले सर सर्व केंद्रप्रमुख विज्ञान शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मा.श्री सचिन जी. सकळकळे सर सचिव तथा जिल्हा विज्ञान शिक्षक संघटना सदस्य श्री प्रविण एस.पाटील सर व मूल्यमापन समिती प्रमुख श्री. नरेंद्र नारखेडेसर व श्री. राजेंद्रजी गव्हाणेसर आदी मान्यवर उपस्थित होते.
या विज्ञान प्रदर्शनीच्या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी श्री एन जे फाळके साहेब यांनी केले .त्यात त्यांनी शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाचे महत्त्व तसेच या प्रदर्शनीमुळे विद्यार्थ्यांना होणारे फायदे याविषयी माहिती सांगितली या प्रदर्शनात तालुक्यातील प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक तसेच खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा अशा एकूण 125 शाळांनी सहभाग घेतला असे त्यांनी सांगितले प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर अरविंद जी कोलते यांनी आपण सुद्धा जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी होतो त्यांच्या बालपणीच्या काही आठवणी त्यांनी याप्रसंगी विशद केल्या तसेच आपल्या मनात जो पर्यंत का ?कसे ? असे प्रश्न स्वतःलाच निर्माण होत नाही त्याशिवाय आपण वैज्ञानिक प्रगती करू शकत नाही असे त्यांनी सांगितले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार श्री चैनसुखजी संचेती यांनी विविध उदाहरणे व दाखले देऊन विज्ञानामुळे जीवनमान कसे प्रगतिशील व अद्ययावत होत आहे हे विशद केले तसेच भारत सरकार व राज्य सरकार विज्ञान व तंत्रज्ञान या क्षेत्रात कशाप्रकारे काम करून आपला देश पुढे नेत आहे तसेच देशातील नागरीकांचे जीवनमान उंचावण्या साठी प्रयत्न करत आहे याची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी श्रीमान एनबी शिंदे साहेब यांनी केलेत तर आभार प्रदर्शन श्रीमती वैशाली जोशी मॅडम यांनी केले या कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळा भानगुरा येथील विद्यार्थ्यांनी नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत एक पथनाट्य सादर केले त्याबद्दल सर्व उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले .
विज्ञान प्रदर्शनी चा बक्षीस वितरण कार्यक्रम माननीय नायब तहसीलदार श्रीमती चौधरी मॅडम प्राचार्य श्री अनिल खर्चे सर डीन श्री योगेश खर्चे सर रमाकांत चौधरी सर गटशिक्षणाधिकारी श्री एन जे फाळके साहेब विस्तार अधिकारी श्री एन व्ही शिंदे साहेब तालुका विज्ञान संघटनेचे अध्यक्ष श्री सकळकडे सर सचिव श्री प्रविण पाटील तालुका शिक्षक संघटनांचे सर्व अध्यक्ष सर्व केंद्रप्रमुख तसेच विज्ञान शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी यांच्या शुभहस्ते करण्यात आले यात उपकरण निर्मिती प्राथमिक विभाग वर्ग एक ते पाच मधून प्रथम क्रमांक अमर निलेश वानखेडे जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा कुंड बुद्रुक द्वितीय क्रमांक वैष्णवी विनोद गव्हाळे जि प उच्च प्राथमिक शाळा घिर्णी तृतीय क्रमांक ओवी प्रफुल नाफडे जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा मोरखेड यांनी प्राप्त केला उच्च प्राथमिक विभाग म्हणजेच वर्ग ६ ते ८ मधून विज्ञान उपकरण निर्मितीमध्ये विष्णू विनोद वनारे जि प मराठी उच्च प्राथमिक शाळा घिर्णी या विद्यार्थ्यांने प्रथम क्रमांक यज्ञेश पद्माकर झोपे डी एस हायस्कूल दाताळा या विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक तर तृतीय क्रमांक ओम संजय पवार जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा हरसोडा यांना देण्यात आला माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक यश चंद्रकांत भोळे डी ई एस हायस्कूल धरणगाव द्वितीय क्रमांक अंकुश मुकुंद खर्चे एम एस एम इंग्लिश स्कूल मलकापूर तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस समृद्धी दीपक देशमुख डी एस हायस्कूल दाताळा यांना देण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राजेंद्र गव्हाणे सर व केंद्रप्रमुख श्री अनिल खर्चे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री नरेंद्र नारखेडे सर यांनी केले अशाप्रकारे मोठ्या उत्साहात तालुका विज्ञान प्रदर्शनी संपन्न झाली.