मलकापूर :- शहरालगत असलेल्या शिवाजीनगर स्थित हिंदू स्मशानभूमीच्या मागील बाजूला एक अज्ञात अंदाजे 40 ते 50 वर्षीय अनोळखी इसमाचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत आढळून आलेले आहे सदर इसमाची ओळख पटविण्याचे आवाहन मलकापूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की मलकापूर शहरातील शिवाजीनगर स्थित असलेल्या हिंदू स्मशानभूमीच्या मागील नळगंगा नदीच्या काठावर अंदाजे ४० ते ५० वर्षीय अनोळखी इसमाचे कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. ही घटना ही दि.९ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १० वा. उघडकीस आली होती मृताच्या अंगामध्ये राखाडी कलरचे बनियान व काळसर रंगाची फुल पेंट घातलेली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.याप्रकरणी पोलिसांनी ४६/२०२४ क.१९४ बी. एन. एस. एस. प्रमाणे मर्ग दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे तसेच सदर इसमाचे ओळख पटविण्याचे आव्हान मलकापूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे.