मलकापूर :- इंदिरा बहुउद्देशीय शिक्षण संस्था (IBSS) संचलित
संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री. योगेंद्रजी गोडे साहेब आणि माननीय सचिव कु. तन्वी गोडे मॅडम यांच्या प्रेरणेने डॉ. राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालय, मलकापूर येथे प्राचार्य डॉ. प्रशांत देशमुख सर व शैक्षणिक व्यवस्थापक डॉ. वैभव अढाव सर यांच्या मार्गदर्शनाखाली पूल कॅम्पस आयोजित करण्यात आला होता.
भरतीमध्ये 32 विद्यार्थ्यांची यशस्वी निवड झाली. ही भरती मोहीम डॉ राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल तर्फे One Asia Network India Pvt. Ltd., खामगाव यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती.संस्थेचे व्यवस्थापन, प्राचार्य व सर्व प्राध्यापकांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची मेहनत, जिद्द आणि व्यावसायिक क्षेत्रात प्रवेश करण्याची तयारी स्पष्टपणे दिसून येते.या भरती प्रक्रियेमध्ये डी. फार्मसी, बी. फार्मसी आणि एम. फार्मसीच्या अंतिम वर्ष व उत्तीर्ण एकूण 87 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. निवड प्रक्रियेत लेखी (Aptitude) चाचणी नंतर 55 विद्यार्थी तांत्रिक मुलाखत आणि एचआर मुलाखती साठी पात्र झाले. सखोल मूल्यांकनानंतर 32 विद्यार्थ्यांची रिसर्च अँड डेव्हलपमेंट, प्रॉडक्शन, क्वालिटी अश्युरन्स आणि क्वालिटी कंट्रोल या विविध विभागांसाठी निवड करण्यात आली.
या मध्ये डॉ राजेन्द्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी, मलकापूर, संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फार्मसी बुलढाणा, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी अंजनगाव, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अकोला व राजर्षी शाहू कॉलेज ऑफ फार्मसी बुलढाणा येथील विद्यार्थ्यांनि सहभाग नोंदवला.
महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल अभिमान व्यक्त करत ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे कौतुक केले. तसेच, विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना तयार करण्यात प्राध्यापकांचा मोलाचा वाटा असल्याचे नमूद करण्यात आले.ही कामगिरी संस्थेच्या शैक्षणिक उत्कृष्टता व करिअर विकासाच्या बांधिलकीचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहेत.भविष्यात मार्केटिंग, मेडिकल कोडींग या क्षेत्रातील कंपन्या साठी पण प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात येणाची माहिती प्राचार्य प्रशांत देशमुख यांनी दिली.या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह साठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल कडून प्रा. रितेश पोपट, प्रा. अमित कुडके, प्रा. आशिष राठी, प्रा. विकास घाईत, प्रा. करण गायकवाड व प्रा. मोहिनी क्षिरसागर यांनी अथक परिश्रम घेतले.