Headlines

संविधान वाचले तरच देश वाचेल – अजय सावळे

 

मलकापूर – फुले शाहू आंबेडकर विचार मंचाच्या वतीने ग्राम भालेगाव येथे 75 वा संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भालेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते गजानन खर्चे होते. प्रमुख उपस्थितींमध्ये मलकापूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संदीप काळे, अजय सावळे, प्राध्यापक निकाळजे सर, आतिश खराटे, आणि सुशील मोरे उपस्थित होते.
कार्यक्रमात अजय सावळे यांनी संविधानाविषयी सखोल मार्गदर्शन करत, “संविधान हे देशाचा आत्मा आहे, आणि संविधान वाचले तरच देश वाचेल,” असे प्रतिपादन केले. त्यांनी संविधानाची महत्त्वपूर्णता सांगताना, त्याच्या वाचनानेच समाजात समतेचे, बंधुत्वाचे आणि न्यायाचे मूल्य रुजवता येतात, असे स्पष्ट केले.
पोलीस निरीक्षक संदीप काळे यांनी संविधानाचे महत्त्व सांगताना, त्याने दिलेले अधिकार आणि कर्तव्ये यांची चर्चा केली. त्यांनी संविधानाचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे लक्षात आणून दिले.
प्राध्यापक निकाळजे सर यांनी संविधान निर्माण करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना किती संघर्ष करावा लागला यावर प्रकाश टाकला, तसेच संविधानाच्या मुलभूत तत्त्वांची माहिती दिली.आतिश खराटे यांनी सुद्धा संविधानाविषयी सखोल माहिती दिली, तर गजानन खर्चे यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षतेखाली संविधानाच्या महत्त्वावर भाष्य केले आणि कर्तव्यांची जाणीव करून दिली.या कार्यक्रमात भालेगाव आणि आजूबाजूच्या गावांतील नागरिक, महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भीमराव नेतो, स्वप्निल भालेराव, भगवान घुले, मयुरेश खर्चे, अमोल भगत, अवि सोनवणे, सिद्धार्थ कोंगळे आणि संतोष इंगळे यांनी कठोर परिश्रम घेतले.
संविधान दिवसाच्या या ऐतिहासिक निमित्ताने नागरिकांना संविधानाची गोडी लागली आणि त्याच्या महत्वाची जाणीव झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!