Headlines

मलकापूरातील बिर्ला रोडवरून दुचाकी चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल!

मलकापूर : – शहरातील बिर्ला रोडवरील हकीमी हॉस्पिटल परिसरातून उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरणखेड (ता. मलकापूर) येथील रहिवासी तसेच कृषी केंद्र चालक अरविंद अशोक खाचणे (वय 37) यांनी आपल्या दैनंदिन वापरासाठी बजाज प्लॅटीना (क्रमांक एमएच-28-बीएफ-1820) ही दुचाकी घेतली होती. 8 मार्च 2026 रोजी सकाळी सुमारे 11.30 वाजता ते घरगुती साहित्य खरेदी करण्यासाठी मलकापूर शहरातील बिर्ला रोडवरील हकीमी हॉस्पिटलजवळ आले होते.
त्यावेळी त्यांनी आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी करून बाजारात खरेदीसाठी गेले. काही वेळाने परत आले असता दुचाकी उभी केलेल्या ठिकाणी दिसून आली नाही. परिसरात बराच शोध घेतला तसेच ओळखीच्या व्यक्तींना विचारपूस केली; मात्र गाडीचा कोणताही मागमूस लागला नाही.
पाच दिवस स्वतःच्या स्तरावर शोध घेतल्यानंतरही दुचाकी मिळून न आल्याने अखेर अरविंद खाचणे यांनी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. दरम्यान, शहरातील गजबजलेल्या ठिकाणावरून दुचाकी चोरीला गेल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!