Headlines

मलकापुरात कथित अनैतिक प्रकाराच्या संशयावरून महिलेला मारहाण; नागरिकांच्या संतापामुळे परिसरात तणाव

 

मलकापूर :- शहरातील मध्यवर्ती वस्तीत कथित अनैतिक व्यवहार सुरू असल्याच्या संशयावरून संतप्त नागरिकांनी एका महिलेला मारहाण केल्याची घटना बुधवारी (५ मार्च) दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. माहितीनुसार, शहरातील गजबजलेल्या भागातील एका खासगी इमारतीत राहणाऱ्या महिलेच्या घरात काही दिवसांपासून बाहेरून महिलांना बोलावले जात असल्याची चर्चा परिसरात सुरू होती. तसेच त्या ठिकाणी दिवसभर अनोळखी व्यक्तींची ये-जा वाढल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती.
परिसरात कुटुंबांसह लहान मुले-मुली राहत असल्याने अशा प्रकारामुळे सामाजिक वातावरण बिघडत असल्याचे सांगत नागरिकांनी यापूर्वी संबंधित महिलेला समज देऊन हा प्रकार थांबविण्याची विनंती केली होती. मात्र परिस्थितीत बदल झाला नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान, बुधवारी दुपारी काही नागरिकांनी संबंधित महिलेला जाब विचारण्यासाठी तिच्या निवासस्थानी धाव घेतली. यावेळी झालेल्या वादातून परिस्थिती चिघळली आणि संतप्त नागरिकांनी महिलेला मारहाण केल्याचे समजते.
या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!