मलकापूर बसस्थानक चोरट्यांचे माहेरघर? बसमध्ये चढताना ५० हजारांची चोरी

 

मलकापूर : शहरातील बसस्थानक परिसरात पुन्हा एकदा चोरीची घटना समोर आली असून बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने प्रवाशाच्या खिशातील ५० हजार रुपये लांबविल्याची घटना घडली आहे. बसस्थानक परिसरात वारंवार होत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे हा परिसर चोरट्यांचे माहेरघर बनल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद वशीम मोहम्मद मुशीर (वय ३२) रा. इदगाह प्लॉट, पारपेठ मलकापूर यांनी शहर पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, ते मलकापूर बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना त्यांच्या खिशात असलेले ५० हजार रुपये अज्ञात चोरट्याने चोरून नेले. गर्दीचा फायदा घेत चोरट्याने ही चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणी शहर पोलिसांनी अप. नं. १६६/२०२६, कलम ३०३(२) बीएनएस अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ आमोल शेळे करीत आहेत. दरम्यान, मलकापूर बसस्थानक परिसरात वारंवार चोरी, पाकिटमारी व सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे बसस्थानक परिसरात पोलीस गस्त वाढविणे आणि सीसीटीव्ही यंत्रणा अधिक सक्षम करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!