Headlines

मलकापूर तालुक्यातील 20 वर्षीय तरुणी बेपत्ता! मलकापूर ग्रामीण पोलिसांत नोंद

 

मलकापूर :- तालुक्यातील सिराढोण येथे २० वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.
तुकाराम चहादु राणे (वय ४८) हे १२ फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे शेतातील काम आटोपून घरी आले होते. सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास ते गुरांना चारा-पाणी करण्यासाठी बाहेर गेले. त्या वेळी त्यांची मुलगी वैष्णवी (वय २०) घरी एकटीच होती. काही वेळानंतर घरी परतल्यावर वैष्णवी घरात नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सुरुवातीला ती शेजारी किंवा ओळखीच्या ठिकाणी गेली असावी, असा समज कुटुंबीयांनी केला. मात्र बराच वेळ लोटूनही ती परत न आल्याने नातेवाईकांकडे व गावात शोध घेण्यात आला. तरीही तिचा ठावठिकाणा न लागल्याने अखेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
वैष्णवी हिचा रंग गोरा असून तिने हिरव्या रंगाचा टॉप परिधान केला होता. संबंधित तरुणीबाबत कोणाला माहिती मिळाल्यास मलकापूर ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!