Headlines

मलकापुरात किरकोळ वादातून कुऱ्हाडीने हल्ला; २१ वर्षीय तरुण गंभीर जखमी, तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

 

 

मलकापूर : – शहरातील गणवाडी रोडवरील गोरक्षण शेत परिसरात बैलगाडा शर्यतीचा सराव पाहण्यासाठी गेलेल्या २१ वर्षीय तरुणावर किरकोळ कारणावरून कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सायकलपुरा परिसरातील सैयद शहनवाज सैयद नाशीर (वय २१) हा १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गणवाडी रोड परिसरात सुरू असलेला बैलांचा सराव पाहण्यासाठी गेला होता. त्यावेळी तेथे काही व्यक्तींमध्ये वाद सुरू होता. शहनवाज तेथे उभा असल्याचे पाहून आरोपींनी त्याच्याशी वाद घालत शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे. वाद वाढत गेल्यानंतर गोलू राजपूत याने संतापाच्या भरात जवळील कुऱ्हाडीने शहनवाजवर वार केल्याचा आरोप आहे. हा वार त्याच्या डाव्या कानाजवळ लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर इतर आरोपींनीही त्याला मारहाण केल्याचे सांगितले जाते. जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!