मलकापूर : – पाण्याची नळी टाकण्याच्या वादातून दोन कुटुंबांत तणाव निर्माण होऊन एका महिलेला मारहाण व धमकी दिल्याची घटना तालुक्यातील वाघूड येथे ८ फेब्रुवारी रोजी सकाळी घडली.वाघूड येथील रहिवासी जिजाबाई ज्ञानदेव बगाडे (वय ४२) यांच्या घरासमोरून पाणी नेण्यासाठी नळी टाकण्यात येत होती. ही नळी त्यांच्या जागेतून टाकली जात असल्याने त्यांनी यास विरोध केला. यावरून शेजारील कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद उफाळून आला. वाद वाढत गेल्यानंतर संबंधित आरोपींनी महिलेस शिवीगाळ करत मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या गोंधळादरम्यान जिजाबाई बगाडे यांच्या गळ्यातील सोन्याची पोत गहाळ झाल्याचेही त्यांच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी मलकापूर पोलिस ठाण्यात गोविंदा गोपाळ राऊत, अन्नपूर्णा गोपाळ राऊत, करण मुरली राऊत आणि गौरव मुरली राऊत (सर्व रा. वाघूड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
घरासमोर नळी टाकण्यावरून वाद; वाघूडमध्ये महिलेला धमकी व मारहाण! मलकापूर पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
