Headlines

फोटो काढण्याच्या वादातून मलकापूरमध्ये अल्पवयीन युवकावर फायटरने हल्ला; मलकापूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल!

 

मलकापूर : – मलकापूर शहरातील नवीन ईदगाह परिसरात फोटो काढण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून एका १७ वर्षीय युवकावर फायटरने हल्ला करून त्याला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
अहमदशरपुर पारपेठ परिसरात राहणारा सैयद मोहीद मिर सैयद मुश्ताक (वय १७) हा १ फेब्रुवारी रोजी दुपारी आपल्या मित्रांसोबत नवीन ईदगाह परिसरात फोटो काढत होता. त्यावेळी आरोपी अर्शद खान उर्फ गुड्डू अब्दुल खान ठेकेदार (रा. मदारटेकडी, मलकापूर) तेथे आला. फोटो काढण्यावरून त्याने मोहिदसोबत वाद घालत शिवीगाळ केली. वाद वाढताच आरोपीने हातातील फायटरने मोहिदच्या मानेवर व खांद्यावर वार करून त्याला जखमी केले. तसेच त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
या घटनेनंतर जखमी युवकाने मलकापूर शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. शहरात किरकोळ कारणावरून होणाऱ्या हिंसक घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!