मलकापूर : – माळवी सोनार समाज मलकापूरच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथी उत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. हा उत्सव बुधवार, दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला असून, त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवाची सुरुवात आज मंगळवार, दि. ३ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता हरी भजनाने होणार आहे. त्यानंतर बुधवार, दि. ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता श्री संत नरहरी महाराजांचा अभिषेक सोहळा पार पडणार आहे. सकाळी ९.३० वाजता मंदिरातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून, ही मिरवणूक नूतन विद्यालय रोड, गाडगेबाबा महाराज चौक, बुलढाणा रोड, हनुमान चौक, तहसील चौक मार्गे महेश भवन गोरक्षण संस्थानपर्यंत जाऊन पुन्हा मंदिरात समाप्त होईल. यानंतर सकाळी ११ वाजता ह.भ.प. मीराताई सिंगाईतकर (जामनेर) यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या सर्व कार्यक्रमांचा समाज बांधवांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन माळवी सोनार समाजाचे अध्यक्ष सुभाष शंकर ठोसर यांनी केले आहे.
