Headlines

विदर्भ लाईव्हच्या बातमीचा इम्पॅक्ट; माता महाकाली नगरमध्ये अखेर नाल्यांची पूर्ण सफाई, नगरसेवक प्रत्यक्ष मैदानात!

 

मलकापूर :- (उमेश इटणारे)
शहरातील माता महाकाली नगरमध्ये नाल्यांच्या अर्धवट साफसफाईवरून निर्माण झालेल्या नाराजीला अखेर दिलासा मिळाला आहे. विदर्भ लाईव्हने २० जानेवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या बातमीची दखल घेत नगरपालिकेने तत्काळ कारवाई करत प्रभाग क्रमांक १४ मधील नाल्यांची सफाई सुरू केली. विशेष म्हणजे, या वेळी नगरसेवक अशांतभाई वानखेडे आणि नगरसेवक विशाल मधवानी हे स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून कर्मचाऱ्यांकडून नाल्यांची साफसफाई करून घेतली.
माता महाकाली नगर हे प्रभाग क्रमांक १४ आणि १५ मध्ये विभागले गेले असून, यापूर्वी प्रभागाच्या हद्दीचा मुद्दा पुढे करत काही नाल्या साफ न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. डासांचा प्रादुर्भाव, रोगराईचा धोका आणि आरोग्याच्या समस्या यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. ही बाब विदर्भ लाईव्हने ठळकपणे मांडल्यानंतर प्रशासन हालचालीत आले.
आज २१ जानेवारी रोजी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा परिसरात पाठवण्यात आले. नगरसेवक अशांतभाई वानखेडे आणि विशाल मधवानी यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून स्वच्छतेच्या कामावर लक्ष ठेवले. नाल्यांची सखोल साफसफाई करण्यात आल्याने परिसरात साचलेला कचरा व घाण दूर झाली. या तत्पर कारवाईमुळे माता महाकाली नगरमधील नागरिकांनी नगरपालिकेचे तसेच दोन्ही नगरसेवकांचे आभार मानले आहेत. माध्यमांच्या पाठपुराव्यामुळे आणि लोकप्रतिनिधींच्या सक्रिय भूमिकेमुळे नागरिकांच्या समस्यांना न्याय मिळाल्याचे समाधान व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!