मलकापूर (प्रतिनिधी)
मलकापूर नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्र. 12 (ब) मधून अपक्ष उमेदवार ऑटो या निवड चिन्हावर उभे राहिले असून प्रभागातील नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद व पसंती मिळत असल्याची चर्चा सुरू आहे. प्रभागातील सर्व समाजघटकांमध्ये साधा, प्रामाणिक आणि सर्वांना सहज उपलब्ध असलेला चेहरा म्हणून ओळख निर्माण केलेल्या या उमेदवाराने दारोदारी भेटी देत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. स्वच्छ प्रशासन, विकासकामांची पारदर्शकता, जलव्यवस्था, रस्ते, गटारी, स्वच्छता व युवकांसाठी रोजगारांच्या संधी या मुख्य मुद्द्यांवर त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. नागरिक म्हणतात की,
प्रभागाला खऱ्या अर्थाने काम करणारा आणि सदैव उपलब्ध राहणारा प्रतिनिधी हवा आहे, त्यामुळेच या अपक्ष उमेदवारास समर्थन मिळत आहे. प्रभागात सर्वत्र “ऑटो” या निशाणीवर मतदान करा असा जनसंदेश दिला जात असून निवडणुकीदरम्यान या उमेदवाराची लोकप्रियता वाढताना दिसत आहे.
