Headlines

पद्मश्री डॉ व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्सहात साजरा

 

मलकापूर :- पद्मश्री डॉ.व्ही. बी.कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राष्ट्रीय छात्र सेना विभाग व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 21 जून 2024 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असल्याने आणि सूर्याचं दक्षिणायन सुरु होण्याचा हा काळ असल्यानं या संक्रमण काळात योगाचा जास्त फायदा होतो म्हणून 21 जूनची निवड या दिवसासाठी करण्यात आली.
भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यांमध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे.

महाविद्यालयात सकाळी 9.30 वाजता सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विदयार्थ्यांनी,महाविद्यालयात निसर्गरम्य वातावरणामध्ये योगाभ्यास केला. या प्रसंगी मलकापूर शहरातील योग पंडित श्री. अविनाश पाटील, कुमार अथर्व संभारे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्ययात आले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात योग व प्राचीन काळापासून असणारे योगाचे महत्व तसेच आजच्या काळात योग हि आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याची गरज आहे असे सांगितले. तसेच आजच्या काळामध्ये प्रत्येकव्यक्ती हा वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधीनिग्रस्त आहे व त्यावर रामबाण उपाय म्हणजे योग अभ्यास व त्याचा सराव हा आहे. प्रथम वॉर्मअप करून योगाभ्यासाला सुरवात करण्यात आली. या मध्ये श्री अविनाश पाटील सरानी बेसिक आसनाचा अभ्यास करून घेतला, प्रात्यिक्षिके करून योग आसनाचे सादरीकरण केले. तसेच पवनमुक्तासन, भुजंगासन,पश्चिमोत्तानासन, वज्रासन, धनुरासन,मत्स्यासन, पादहस्तासन, सर्वांगासन, नौकासन, चक्की चालनसन, वृक्षासन,कोनासन, हास्यसन अशा विविध योग आसनाचा , त्याच प्रमाणे कपालभाती, भस्त्रिका, शितली, नाडी शोधन प्राणायाम, उज्जायी प्राणायाम, अनुलोम- विलोम, भामरी इत्यादी प्राणायामबद्दल विस्तृत माहिती दिली.

या सत्राला प्राचार्य डॉ. अनिल खर्चे, डॉ. युगेश खर्चे तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सचिन बोरले,क्रीडा विभाग प्रमुख कैलास कोळी , राष्ट्रीय शास्त्र सेना अधिकारी जावेद सर, प्रा तेजल खर्चे, प्रा सचिन कोलते, प्रा. तोष्णीवाल मॅडम, प्रा रुपाली पाटील मॅडम तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विदयार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!