Headlines

प्रा. डॉ. छाया ठिंगळे-पालवे यांना स्वयंसिद्धा राष्ट्रीय पुरस्कार

 

नाशिक – जागतिक महिला दिनानिमित्त दर्पण कार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ, नाशिक यांच्या वतीने प्रा. डॉ. छाया ठिंगळे-पालवे यांना त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्यासाठी स्वयंसिद्धा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रा. ठिंगळे-पालवे या श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयात मागील २५ वर्षांपासून कार्यरत असून, २४ वर्षांपासून महिला दक्षता समितीच्या माध्यमातून महिलांच्या सुरक्षेसाठी कार्य करीत आहेत. त्यांचे स्वतःचे यूट्यूब चॅनेल असून, त्यावर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दिनांचे महत्त्व, अभ्यासक्रमाशी संबंधित माहितीपर व्हिडिओ आणि विविध विषयांवर समुपदेशनाचे सत्रे उपलब्ध आहेत. महिलांच्या हक्कांसाठी आणि शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना हा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाच्या चेअरमन अॅड. रोहिणीताई खडसे-खेवलकर, प्राचार्य प्रा. डॉ. एच. ए. महाजन, उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. पी. पाटील तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी वर्गाने त्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!