Headlines

अज्ञात वाहनाच्या धडकेत पती-पत्नी ठार; रणथम फाट्यानजीकची घटना

 

मलकापूर: राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वर रणथम फाट्यानजीक अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ११ जानेवारी रोजी सायंकाळी ६:३० वाजता घडली.
या बाबत सविस्तर वृत्त असे की रूईखेड (ता. मुक्ताईनगर) येथील निना ज्ञानदेव नारखेडे (वय ६५) व सुनिता निना नारखेडे (वय ५९) हे पती-पत्नी पुर्णाकाठवरील दुधलगाव येथे नातेवाईकांच्या भेटीसाठी गेले होते. भेटीनंतर घरी परतत असताना रणथम फाट्यानजीक त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या भीषण अपघातात दोघे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच महामार्गावरील टोलनाक्यावरील रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्यांनी (सचिन संबारे, दीपक म्हस्कादे, निना खडसे) तातडीने जखमींना उपजिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर दोघांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!