Headlines

डॉक्टरने उचलले टोकाचे पाऊल, गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा; मेहकर तालुक्यातील घटना!

 

डोणगाव (ता. मेहकर):- येथे वैद्यकीय सेवा देणाऱ्या श्रीकृष्ण विजय बनसोड (३५, रा. लोणार) यांनी ९ जानेवारी रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. फसवणुकीच्या गुन्ह्यामुळे आलेल्या तणावातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे.बोगस डॉक्टर असल्याच्या तक्रारींनंतर ३ जानेवारी रोजी त्यांच्या दवाखान्यावर धाड टाकून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.घटनेची माहिती मिळताच डोणगाव पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी मर्ग दाखल करण्यात आला असून ठाणेदार अमरनाथ नागरे तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!