सुळे (ता. मुक्ताईनगर): गावातील समाधान निना रत्नपारखी (सोनार) (वय 68) हे सकाळपासून घरातून कोणालाही न सांगता निघून गेले आहेत. ते मनोरुग्ण असून स्वतःची ओळख सांगण्यास असमर्थ आहेत. त्यांच्या हरवल्यामुळे कुटुंबीय चिंतेत आहेत.
समाधान निना रत्नपारखी यांची उंची 4 फूट 6 इंच असून रंग सावळा आहे. त्यांचे केस बारीक व पांढरे आहेत. हरवण्याच्या वेळी त्यांनी फिकट लाल रंगाचा लांब बाह्यांचा शर्ट, काळी पँट व चप्पल परिधान केली होती. त्यांची दाढी वाढलेली आहे. सदर व्यक्ती कोणालाही दिसल्यास किंवा त्यांच्या संदर्भात कोणतीही माहिती मिळाल्यास, पोलिसांना त्वरित संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.