Headlines

सोन्याची चैन हिसकावून चोरटे फरार; शेगाव येथील घटना

शेगाव: दुचाकीवरून पाठलाग करत आलेल्या दोन व्यक्तींनी एका महिलेच्या गळ्यातील चैन काढून घेण्याचा प्रकार ११ जानेवारी संध्याकाळी घडला.

फिर्यादी सौ. माधुरी महेश गणगणे, वय ३०, रा. जुने महादेव मंदिर खिडकी, यांनी शेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीत म्हटले आहे की, त्या व त्यांच्या मुलीने संध्याकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपून घरी परत येत असताना बाळापुर रोडवरील मुर्सलगाव शाळेजवळ दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन घेण्याचा प्रयत्न केला.

यावेळी गळ्यातील चैन ११ ग्रॅम वजनाची असून अंदाजे किंमत ४८,००० रुपये असल्याचे नमूद करण्यात आले. सदर व्यक्ती मोटरसायकलने वेगाने निघून गेल्याचे सांगण्यात आले. यावरून पोलीसांनी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!