Headlines

टाळ-मृदंगाच्या गजरात शहर दुमदुमलं; संत नरहरी महाराज पुण्यतिथी उत्सवात भक्तांचा महासागर

 

मलकापूर :- माळवी सोनार समाज मलकापूरच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. समाजाचे अध्यक्ष सुभाष ठोसर व पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून हा उत्सव भक्तिमय वातावरणात पार पडला.
बुधवारी (४ फेब्रुवारी) सकाळी संत नरहरी महाराजांच्या मंदिरात अभिषेक सोहळ्याने कार्यक्रमास सुरुवात झाली. त्यानंतर टाळ-मृदंगाच्या गजरात आणि भक्तीगीतांच्या निनादात संतांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक शहरातून काढण्यात आली. ही मिरवणूक मंदिरापासून गोरक्षण संस्थान मार्गे हनुमान चौक, तहसील चौक, संत गाडगेबाबा चौक असा मार्ग पार करत पुन्हा मंदिरात पोहोचली.
यानंतर ह.भ.प. मिराताई सिंगाईतकर यांच्या कीर्तनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. महिला व पुरुष भक्तांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाचा लाभ घेतला. महाप्रसादाने उत्सवाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!