मलकापूर :- आजच्या धावपळीच्या युगात जिवन जगणारा आजचा हिंदू हा आपल्या संस्कृती, संस्कार, विचार, आचार, कर्तव्य,धर्म ह्यापासून दूर चाललेला आहे,नोकरी,पैसा,पत्नी,गाडी, बंगला ह्यालाच तो आपलं सर्वस्व समजून बसला पण ज्याला तो सर्वस्व समजून बसलाय त्याला ते सर्वस्व प्राप्त होण्यामागे सर्वात मोठा सिंहाचा वाटा जर कुणाचा असेल तर तो पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा आहे.
आज जर हे महापुरुष नसते तर आपल्या सर्वांची केव्हाचीच सुन्नत झाली असती, ह्या दोनीही महापुरुषांनी जे बलिदान दिल ते आपल्याला सुख, समाधान प्राप्त व्हावं ह्याकरिता, पण आपण त्यांना काय देतोय, आपल्याला शिवाजी महाराजांची आठवण येते पण कधी शिवजयंती आली कि, संभाजी महाराजांची आठवण येते पण कधी त्यांची जयंती आली कि, अरे पण त्यांनी आपल्यासाठी केलेला त्याग किती मोठा आहे अनेक जन्म घेऊन सुद्धा फिटणार नाहीत असे उपकार ह्या महापुरुषांचे आहे..
40 दिवस छळ केला औरंगजेबाने आपल्या राजाचा, एकच विनंती करायचा “इस्लाम कुबुल करो, हम तुम्हे छोड देंगे” पण आयुष्यात हरलात तरी चालेल पण आपला स्वाभिमान सोडता कामा नये,मरण पतकारल पण धर्म सोडला नाही, हा सर्व त्याग तुम्हा-आपल्यासाठीच होता आणि त्याच बलिदानाची, शौर्याची, स्वाभिमानाची आठवण म्हणून, ज्या दिवशी संभाजी महाराजांना पकडलं तो दिवस आणि ज्या दिवशी त्यांनी अखेरचा श्वास घेतला तो दिवस म्हणजे “फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या”
दि. 18 फेब्रुवारी 2026 ते दि. 18 मार्च 2026 ह्या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये *”धर्मवीर बलिदान मास”* पाळल्या जातो, छत्रपती संभाजी महाराजांच्या त्यागाची, बलिदानाची आठवण म्हणून कित्येक तरुण मुंडण करतात, पायात चप्पल न घालता अनवानी फिरतात, एकवेळ जेवण करतात, जमिनीवर झोपतात, गोड पदार्थ,सण-उत्सव ह्यामध्ये सहभागी होणे टाळतात, का? तर आपल्याला सुद्धा जाणीव झाली पाहिजेत कि धर्मवीर श्री संभाजी महाराजांनी केलेला त्याग किती मोठा होता ते, 40 दिवस वेगवेगळ्या प्रकारचे त्रास देऊन औरंजेब महाराजांना वेदना देत होता त्यांच्या त्या वेदनांपुढे आपल्या वेदना तरी किती ?
म्हणून धर्मवीर बलिदान मास पाळणे हे प्रत्येक हिंदूंचे आद्यकर्तव्य आहे असं आव्हान महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार ह.भ.प. माधव महाराज पाटील यांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून केलं
