Headlines

अवैध देशी दारू विकणाऱ्याविरुद्ध नांदुरा पोलिसांची कारवाई, 1150 रु मुद्देमाल जप्त!

नांदुरा – अवैध देशी दारू विकणाऱ्याविरूध्द नांदुरा पोलिसांनी कारवाई करत ११५० रू. चा मुद्देमाल जप्त केला.९ सप्टेंबर रोजी विनापरवाना अवैधरित्या देशी दारू विक्री करणार आरोपी नामे संजय राजाराम वाकोडे (वय ४ २ वर्ष) रा. मोमीनाबाद याचे विरुध्द महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वय कारवाई करून त्याच्या ताब्यातून देशी दारू संत्रा ९९९ कंपनीच्या १८० एमएलच्या १६ नग शीशा व इतर असा एकूण किमती ११५० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याच्याविरुध्द कायदेशीर कारवाई करून ६५ ई महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.सदरची कारवाई पोनि विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ राजू चौधरी, पोकॉ संदीप ढोले यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *