Headlines

बसस्थानकासमोर उभ्या दोन मॅजिक गाड्यांना आग; शहरात खळबळ

शेगाव – शांततेसाठी प्रसिद्ध असलेल्या शेगाव शहरात मंगळवारी सकाळी घडलेल्या एका अघोषित घटनेने शहरवासीयांमध्ये खळबळ उडवली आहे. शेगाव बसस्थानकासमोर उभ्या असलेल्या दोन मॅजिक वाहनांना अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची घटना सकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. आगीची माहिती मिळताच शेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र तोपर्यंत दोन्ही मॅजिक वाहने पूर्णतः जळून खाक झाली होती. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाहनांना आग शॉर्टसर्किटमुळे लागली की कुण्या समाजकंटकांनी जाणीवपूर्वक पेटवून दिली, याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. पोलीस विभागाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असून लवकरच सत्य स्पष्ट होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
यापूर्वी अशा प्रकारच्या घटना मोठ्या शहरांपुरती मर्यादित होत्या. मात्र आता त्या शेगावसारख्या संतभूमीत घडू लागल्याने नागरीकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने अशा घटना रोखण्यासाठी अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याचे नागरिक म्हणत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!