खामगाव : एक अल्पवयीन मुलगी एक्झरसाईज करीत असतांना जिम ट्रेनरने तिच्याजवळ जावून एक्झरसाईज करण्याबाबत सांगतांना तिच्या लज्जेस धोका पोहोचेल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. त्यामुळे अल्पवयीन मुलगी घरी निघून गेली व आईला ही बाब सांगितली. ही घटना १६ ऑक्टोबर २४ रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास शहरात घडली. याप्रकरणी खामगाव शहर पोस्टेमध्ये दिलेल्या फिर्यादीवरून हेल्थ क्लब, ६ नंबर शाळा परिसर ट्रेनर अमर अर्जुन पिंपळेकर (३२) रा. देशमुख प्लॉट याच्याविरूध्द कलम ७५ (२) बीएनएस सहकलम ८, १२ पोक्सो, सहकलम ३ (१) (डब्ल्यू) (१) (१) (२) ७ (ए) अ.जा. अ. ज.प्र.का. प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद ठाकरे करीत आहेत.