खामगाव : तालुक्यातील गोंधनापूर येथे सुरू असलेल्या एका जुगारावर छापा मारून पोलिसांनी एकास ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ४८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्राप्तमाहितीनुसार, गोंधनापूर येथे जुगार अड्डा सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सापळा रचून छापा मारला असता, अमोल सुधाकर जांभे हा बुधवारी वरली खेळताना आणि
खेळविताना आढळून आला. त्याच्याजवळून वरली मटक्याचे साहित्य आणि रोख असा ४८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी पथकाचे पोहेकॉ सुधाकर थोरात यांनी ग्रामीण पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून उपरोक्त आरोपी विरोधात महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम १२ अन्वये कारवाई करण्यात आली. पुढील तपास खामगाव ग्रामीण पोलिस करीत आहेत.